अंमलबजावणी संचालनालय अर्थातच ईडीने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी समन्स बजावले आहे. ईडीने हे समन्स बुधवारी 1 जून रोजी पाठवले आहे.  नॅशनल हेरॉर्ड प्रकरण इडीने 2015 मध्येच बंद केल. परंतू, केंद्र सरकारला बहुदा ते आवडले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरु असलेल्या संबंधित अधिकाऱ्याला काढून टाकत हे प्रकरण पुन्हा नव्याने तपासासाठी उघडले जात आहे. असेही संघवी यांनी म्हटले.