भाऊ बहिणीचं नात खूप वेगळं असत, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना! या म्हणी प्रमाणे बहिण भावाच नात टाॅम आणि जेरी सारख असत. भांडण जरी झाले तरी या नात्यात दिवसाचा शेवट मात्र गोड होतो. आंबट गोड असणारं हे नात प्रेमाच्या पाकात मुरलेलं असत आणि त्यामुळे भाऊ बहिणीचं नात जगा वेगळं असत.