
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दिवस सिस्टर्स डे ( Sister's Day) म्हणून जगभर साजरा केला जातो. यंदा हा सिस्टर्स डे 6 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. भारतीय कुटुंबांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती जपली जाते त्यामुळे सहाजिकच नात्यांमध्ये जिव्हाळा देखील अधिक असतो. आई नंतर हक्काने ओरडणारी पण तितकीच काळजी घेणारी, माया करणारी व्यक्ती म्हणजे ताई. बहीण जर लहान असेल तर ती घरातल्या सगळ्यांची लाडोबा असते. मग अशा लहान असो वा मोठ्या असो बहिणींप्रती प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस सिस्टर्स डे असल्याने या निमित्ताने तुमच्याही बहिणींना या सिस्टर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, Wishes, Greetings, Images, WhatsApp Status शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.
बहीण ही घरात आईनंतर हक्काने प्रेम करणारी, काळजी करणारी व्यक्ती असते त्यामुळे तिचा आजचा दिवस नक्कीच खास करायला विसरू नका. यानिमित्ताने तिला एखादी भेट किंवा या शुभेच्छा सोशल मीडीयात शेअर करून त्यांचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.
हॅप्पी सिस्टर्स डे 2023

तोंडावर भांडत असलो तरी
मनात खूप प्रेम आहे
आईसारखी माया असलेली
माझ्या आयुष्यात फक्त ताई आहे

रडवायला सार्यांना जमतं
समजवायला सार्यांना जमत
पण रडवून समजवायला
फक्त माझ्या ताईला जमतं
हॅप्पी सिस्टर्स डे!

फुलों का तारों का
सबका कहना है
एक हजारो मैं
मेरी बहना है!

प्रत्येक बहिणीमध्ये
एक मैत्रिण आणि आई लपलेली असते
सिस्टर्स डे च्या शुभेच्छा!


हॅप्पी सिस्टर्स डे!
बहिणीला काही जण ताई, अक्का, दीदी अशी आदराने हाक मारतात. मग आज त्यांच्यासाठी काही खास करून या दिवसाचा आनंद वाढवा. सिस्टर्स डे साजरा करण्यामागे नेमकं कारण नाही परंतू हा दिवस सोशल मीडीयातूनच अधिक लोकप्रिय झाला आहे. मग या निमित्ताने तुमच्या या हक्काच्या मैत्रिणीला स्पेशल वाटेल असं काही करायला विसरू नका.