Sister’s Day 2022 Date in India:आईनंतर तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती बहिण असते. मातृदिन असतो, पितृदिन असतो तसा सिस्टर्स डे ही असतो. प्रेमळ बहिणी प्रती मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या जाव्या , या उद्देशाने सिस्टर्स डे ची सुरवात झाली होती. कारण बहिण तुमच्या जीवनातील अशी व्यक्ती असते जी प्रत्येक परिस्थितीमध्ये नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. ती तुमच्याशी भांडते, त्रास देते पण संकट समयी नेहमीच तुमच्यासोबत असते. बहिणीबद्दल तुमच्या मनात असलेली भावना सांगणेही गरजेचे आहे. यावर्षी सिस्टर्स डे  7 ऑगस्ट रोजी सिस्टर्स डे साजरा केला जाईल. अनेकांना सिस्टर्स डे बद्दलची संपूर्ण माहिती माहित नसते, दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी सिस्टर्स डेचे  महत्व आणि  तारीख घेऊन आहोत, जाणून घ्या संपूर्ण माहिती [हे देखील वाचाInternational Friendship Day 2022 Wishes In Marathi: जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा देत जपा मैत्रीचा धागा]

भारतात सिस्टर्स डे 2022 कधी आहे.

भारतात  सिस्टर्स डे  7 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी'फ्रेंडशीप डे' साजरा केला जातो हे अनेकांना माहित आहे. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सिस्टर्स डेही साजरा केला जातो. हे अनेकांना माहित नसते.

सिस्टर्स डे चे महत्त्व 

बहिण- भाऊ असल्यास सिस्टर्स डे अधिक उत्साहाने साजरा केला जातो. बहिणीला विशेष वाटावे म्हणून तिला आवडत असलेल्या गोष्टी केल्या जातात. बऱ्याचदा सिस्टर्स डे निमित्त बऱ्याच योजना आखल्या जातात. बहिणीला गिफ्ट दिले जातात आणि उत्साहात सिस्टर्स डे साजरा केला जातो. सिस्टर्स डे केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही त्याच दिवशी साजरा केला जातो.  सिस्टर्स डेमुळे  बहीण आणि भावामधील नात आणखी मजबूत होण्यात मदत मिळते. बहिण- भावांना, किंवा बहिणींना एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. आम्हाला आशा आहे की, सिस्टर्स डे तुम्ही उत्साहाने साजरा कराल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व बहिणींना विशेष वाटावे त्यासाठी प्रयत्न कराल. तुमची बहीण ही तुमची सर्वात चांगली मैत्रीण असते त्यामुळे सिस्टर्स डे ही योग्य संधी आहे. २०२२ च्या सिस्टर्स डेच्या शुभेच्छा!