
दरवर्षी ऑगस्ट (August) महिन्याच्या पहिल्या रविवारी (Sunday) सिस्टर्स डे (Sister's Day) साजरा करण्यात येतो. यावर्षी 7 ऑगस्टला महिन्याचा पहिला रविवार येतो म्हणजेच यावर्षी 7 ऑगस्टला सिस्टर्स डे साजरा करण्यात येईल. हा दिवस भावंडांच्या (Siblings) नात्यासाठी खास दिवस आहे. रक्षाबंधन (Raksha Bandhan) किंवा भाऊबीजेसारखे (Bhau Beej) भावाप्रती आदर व्यक्त करणारे साजरे सण आपल्या संस्कृतीत आहेत. पण बहिणीसाठी आदर, प्रेम, भावना व्यक्त करणारा असा कुठला निश्चित दिवस आपल्या कडे नाही. म्हणून सिस्टर्स डेचं महत्व खास आहे. सिस्टर्स डे हा भावंडांच्या प्रेमाचं प्रतिक दर्शवणारा दिवस आहे. भावंडांचं नातं अतुट आहे ते साजरं करण्यासारखा कुठला एक दिवस नाही पण सिस्टर्स डेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बहिणी पूढे व्यक्त होत तिला खास शुभेच्छा देवू शकता.
तुमची बहिण तुमच्या जवळ तुमच्या सोबत राहत असेल किंवा लांब कुठेही तरी हल्ली या डिजीटल (Digital) युगात एकमेकांना शुभेच्छा देणं सहज शक्य झालं आहे. अशाच काही डिजीटल शुभेच्छा (wishes) आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. त्या तुम्ही तुमच्या सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून तुमच्या बहिणीबरोबर नक्की शेअर (Share) करा.

माझी सगळी बडबड ऐकून घेणारी
एक मैत्रीण हवी होती
वेळ पडली तर गोष्टी समजावून
सांगणारी हवी होती
लहान असो वा मोठी मला
बहिण हवी होती
सिस्टर्स डेच्या शुभेच्छा!

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्या सारखा कोणी नाही
सिस्टर्स डेच्या शुभेच्छा!

तोंडावर भांडत असलो ना
तरी मनात खूप प्रेम आहे
आईसारखी माया असलेले
ताई हे दूसरं रुप आहे
सिस्टर्स डेच्या शुभेच्छा!

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे
माझी बहिण….
सिस्टर्स डेच्या शुभेच्छा!

तू केवळ माझी बहीणच नाहीस तर
माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळातील
माझी सर्वोत्तम मैत्रीण आहेस. माझ्या सर्वोत्तम
मैत्रीतील बहिणीला,
सिस्टर्स डेच्या शुभेच्छा!