सध्या धनंजय मुंडे हे नाव बलात्काराचे आरोप आणि परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध अशा दोन अत्यंत संवेदनशील विषयांमुळे चर्चेमध्ये आहेत. चारित्र्यावर गंभीर आरोप झाल्याने राजकीय व्यक्ती आणि पक्षाला मोठा फटका बसतो आणि त्यामुळेच आता एनसीपी पक्ष प्रमुख शरद पवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.