CM Devendra Fadnavis (फोटो सौजन्य - ANI)

बीड मधील यांच्या हत्येवरून वातावरण तापलेलं असताना आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आल्याने ही मागणी आता जोर धरायला लागली आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू असताना आज मीडीयाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दल वक्तव्य केले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंडे, कोकाटे प्रकरण, रक्षा खडसेंच्या मुलीसोबत घडलेला प्रकार यावरू विरोधक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उचलून घेऊ शकतात.

सीएम फडणवीस घेणार का धनंजय मुंडे यांचा राजीनामा?

समाजसेवक अण्णा हजारे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी भूमिका मांडली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारता त्यांनी उत्तर देताना जर नैतिकतेच्या अध:पतनाचा मुद्दा आला तर त्यावेळी भूमिका घेतली जाईल.⁠ आम्ही यावर खूप काही चर्चा केली आहे. असे फडणवीस म्हणाले आहेत. धनयंजय मुंडे आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सध्या जोरदार चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात सोशल मीडीयात मोठा दावा केलाआहे. 3 तारखेला धनंजय मुडेंचा राजीनामा होईल, असे करुणा शर्मा यांनी पोस्ट मध्ये लिहले आहे.

धनंजय मुंडे मागील काही कॅबिनेट मिटिंंगला हजर नव्हते पण आज ते सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमात दिसल्याने सध्या तरी त्यांचा राजीनामा सरकार कडून घेतला जाणार नसल्याचं चित्र दिसत आहे.