NCP leader Chhagan Bhujbal | X @ANI

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा आज (20 मे) मुंबईच्या राजभवानामध्ये शपथविधी पार पडला आहे. एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर भुजबळांनी अजित पवारांची साथ दिली. मात्र महायुतीच्या सरकार मध्ये त्यांना मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर नाराक भुजबळांना आज मंत्रीपद मिळाले आहे.  77 वर्षीय छगन भुजबळांचा शपथविधी संपन्न झाला आहे. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. अद्याप त्यांना कोणतं खातं दिलं जाणार याची माहिती समजू शकलेली नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांनी 'ज्याचा शेवट गोड त्याचे सारेच गोड' असं म्हटलं आहे. तर मंत्रिपदाबद्दल बोलताना मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती स्वीकारायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांना कोणतं मंत्रीपद मिळणार?

 

छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते.  आता नाशिक मध्ये चार मंत्री आहेत.  (हेही वाचा, Maharashtra Cabinet Portfolio Allocation: अखेर राज्यातील खातेवाटप जाहीर, गृहखातं फडणवीस यांच्याकडेच तर अर्थ अजित पवारांकडे).

अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळणार? 

मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. सध्याच्या महायुतीच्या सरकार मध्ये या खात्याची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे होती. पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय त्या खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असल्याने नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे  रिक्त असलेल्या या  अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी पुन्हा भुजबळांकडे येण्याचा अंदाज आहे.