शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Viral: चालत्या बाईकवर पुशअप्स, तरुणाचा स्टंट पाहून नेटकरी संतापले (Watch Video)

व्हायरल Pooja Chavan | Sep 28, 2024 08:40 AM IST
A+
A-

Viral: तरुणांमध्ये रिल्स (Reels) बनवण्याची क्रेझ वाढली आहे. रिल्स बनवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊन व्हिडिओ बनवत असतात. असाच एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तरुण भररस्त्यावर चालत्या बाईकवर पुशअप करताना दिसत आहे. रिल्स बनवण्यासाठी त्याने हे स्टंंट केल्याचे व्हिडिओ दिसत आहे. या व्हिडिओला अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तरुणाने वाहतुकीचे नियम मोडल्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच सुनावले आहे. (हेही वाचा- महिलेने पुसली ओणम निमित्त मुलांनी बनवलेली खास फुलांची रांगोळी; पुढे काय झालं? वाचा)

मिळालेल्या माहितीनुसार, नीरज यादव या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरपूर कंमेट केले आहे. जीव धोक्यात टाकून अश्या प्रकारच्या स्टंट करु नयेत असं एकाने कंमेट केले आहे. तर एकाने वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालून त्याच्यावर योग्य ती कारवाई करा अशी मागणी केली आहे. तर एकाने खतरनाक असं कंमेट केले आहे. विना हेल्मेट बाईक चालवल्याने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.

भररस्त्यात तरुणाचा बाईक स्टंट 

 

View this post on Instagram

 

A post shared by Niraj Yadav Rjd (@niraj_yadav_2512)

 

कारवाई करण्याची मागणी

सोशल मीडियावर प्रसिध्द मिळवण्यासाठी त्याने भररस्त्यात चालत्या बाईकवर पुशअप केले आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाहतुक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन तरुणाला शिक्षा द्यावी, अशी मागणी नेटकरी करत आहे. तरुणांईमध्ये रिल्स बनवण्याचे क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ते काहीही करण्यासाठी तयार होत असतात.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel