Close
Advertisement
 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
22 minutes ago

Mumbai High Court: हुंडा छळ प्रकरणी पतीच्या दूरच्या नातेवाईकांवरही होऊ शकतो गुन्हा दाखल

Videos टीम लेटेस्टली | Jun 14, 2022 04:35 PM IST
A+
A-

मुंबई उच्च न्यायालयाने हुंडा छळाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना, नातेवाइकांवरही हुंड्याचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण आदेश दिला. कलम 498A प्रकरणी एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर (FIR) रद्द करण्यास नकार देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, काही वेळा दूरचे नातेवाईकही दोन व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करतात आणि पत्नीला त्रास देतात. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, "हेच कारण आहे की भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 498A अंतर्गत हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणांमध्ये, त्यांच्या पतीच्या नातेवाईकांवर देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो."

RELATED VIDEOS