गेले काही दिवस संपूर्ण राज्यभर उन्हाचा तडाखा पाहायला मिळाला. फेब्रुवारी महिना सरल्यानंतर आता थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. आज राज्याच्या विविध भागांमध्ये पारा चांगलाच तापला होता. कोकण, विदर्भ, मराठवाडा खानदेशात सूर्यनारायणाने चांगलीच आग ओकली.