
राज्याच्या राजकारणाप्रमाणेच वातावरणातही मोठे फेरबदल (Maharashtra Weather Update) होताना दिसत आहेत. दुपारी कडक उन्हाचा चटका (Maharashtra Temperature) तर अकानक रात्री वातावरणात गारवा मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तीव्र उष्णता. मध्येच वाऱ्याचा वेग वाढून आकाशात निर्माण होणारे ढग, असे काहीसे विचित्रच वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Weather Forecast) या बदलांची नोंद घेताना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये वातावरणातील उष्मा वाढल्याने उष्णतेच्या लाटेचा संभवही व्यक्त केला आहे.
उष्णतेच्या लाटेसोबतच पावसाचाही अंदाज
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामध्ये विदर्भात तीव्र उष्णता पाहायाला मिळू शकते असे म्हटले आहे. अकोला येथे तर पारा 42 अंश सेल्सियसवर गेला आहे. त्यामुळे विदर्भात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आगोदरच म्हटले आहे.दुसऱ्या बाजूला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र काही ठिकाणी तुरळक ते हलक्या व मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather And Temperature: महाराष्ट्रात तापमान वाढ, उष्णतेच्या लाटेची शक्यता; अकोला येथे पारा 40 अंश सेल्सिअस पार)
मुंबईत वातावरण ढगाळ
राज्यात काही भागांमध्ये उष्णतेचा कडाका वाढला असला तरी काही भागात मात्र हवेत आर्द्रता वाढल्याने हलका गारवा जाणवत आहे. ज्या ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे तिथे उकाडा वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळी वातावरण ढगाळ असल्याचे पाहायला मिळाले. दिवसभरामध्ये दुपारच्या वेळी आकाश निरभ्र राहील तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 23°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात उष्णता आणि प्रमाणशीर गारवा यांचा लपंडाव सुरु असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. खास करुन कोल्हापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणी पावासाने हजेरी लावली. दुसऱ्या बाजूला परभणी, वाशिम, वर्धा मालेगाव, यवतमाळ धुळे आदी जिल्ह्यांमध्ये तापमान वाढू लागले आहे. हे तापमाण या जिल्ह्यांमध्ये सरासरी 39 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे पाहायला मिळाले.