भगवान जगन्नाथांच्या स्मरणार्थ काढण्यात येणाऱ्या 'जगन्नाथ रथयात्रे'ची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहे. जगन्नाथ पुरी हे हिंदू धर्मातील बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारका या चार प्रमुख धामांपैकी एक आहे. ओरिसातील जगन्नाथ मंदिर हे वैष्णव पंथाचे मंदिर आहे, जे विष्णु अवतार भगवान कृष्णाला समर्पित असल्याचे मानले जाते.