भारतामध्ये इंजिनियर म्हणजेच अभियंता म्हणून काम करणार्‍यांसाठी 15 सप्टेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये अभियंता महत्त्वाची भूमिका बजावत असतो. देशात भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Sir Mokshagundam Visvesvaraya) यांचा जन्मदिवस म्हणून हा अभियंता दिवस म्हणून साजरा करतात. मग तुमच्या इंजिनियर मित्र मैत्रिणींना, भावंडांना, नातेवाईकांना आजच्या अभियंता दिवसाच्या शुभेच्छा (Happy Engineer's Day) देण्यासाठी खास ग्रिटींग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस WhatsApp Stickers, Facebook Status, Twitter, Instagram च्या माध्यमातून शेअर करत त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करा.