सर्वात अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी इंजिनियरिंगकडे (Engineering) वळतात. मात्र त्यांच्या याच हुशारीवर लोक अनेकदा मिम्स बनवून त्यांची फिरकी घेतात. मात्र त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अथक परिश्रम करून त्यांनी ही इंजिनियर पदवी संपादित केली असते. अशा इंजिनियर्सवर कौतुकाची थाप देण्यासाठी जगभरात आज अभियंता दिवस साजरा केला जात आहे. आधुनिक भारताला एक वेगळी दिशा देणारे भारताचे महान अभियंते आणि भारत रत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या (Mokshagundam Visvesvaraya) यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी 'अभियंता दिवस' (Engineer's Day 2020) साजरा केला जातो. म्हणूनच या दिवसाच्या तमाम अभियंत्यांना शुभेच्छा देणे तितकेच गरजेचे आहे.
कोरोना व्हायरसमुळे सोशल डिस्टंसिंगचे भान राखत तुम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून इंजिनिअर्सना या दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात. त्यासाठी खास इंग्रजी मधून शुभेच्छा संदेश
मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेने पाणीपुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणीपुरवठा योजना सुरू केली. कृष्णराजसागर हे धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. आपल्या तंत्रज्ञानाने भारताला एकत्र जोडणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच भारतातील सर्व अभियंत्यांना शुभेच्छा!