भारतामध्ये आज (15 सप्टेंबर) हा दिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Sir Mokshagundam Visvesvaraya) यांच्या जयंतीच्या औचित्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. तसेच इंजिनिअर्सच्या योगदानाबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली जाते. दरम्यान आज गूगल इंडियाने देखील अनोख्या अंदाजामध्ये अभियंता दिनाच्या शुभेच्छा देत आपलं प्रेम व्यक्त केले आहे. गूगलने एक भलं मोठं समीकरण दिलं आहे. पण त्याचं उत्तर तुम्ही जेव्हा गूगल सर्चमध्ये शोधाल तेव्हा तुम्हांला एक हार्ट बघायला मिळेल. गूगलने इंजिनिअर्स प्रति कृतज्ञता आणि आदर व्यक्त करताना अचूक समीकरण शेअर करत आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत. Happy Engineer's Day 2020: अभियंता दिनाच्या शुभेच्छा Quotes, Wishes, Greetings च्या माध्यमातून देऊन जगभरातील इंजिनिअर मंडळीचा आजचा दिवस करा खास.
गूगलने ट्वीट करत 'sqrt(cos(x))*cos(300x)+sqrt(abs(x))-0.7)*(4-x*x)^0.01, sqrt(6-x^2), -sqrt(6-x^2) from -4.5 to 4.5' या समीकरणाचं उत्तर शोधायला दिलं आहे. पण त्याचा गूगल रिझल्ट बघितला तर तुम्हांला त्यामागची नेमकी भावना समजेल. आणि ती भावना 'प्रेम' आहे.
GOOGLE Tweet
Accurate equation to express our ❤️ for engineers.
Search for:
sqrt(cos(x))*cos(300x)+sqrt(abs(x))-0.7)*(4-x*x)^0.01, sqrt(6-x^2), -sqrt(6-x^2) from -4.5 to 4.5
Happy #EngineersDay!
— Google India (@GoogleIndia) September 15, 2020
आज तुमच्या इंजिनिअर मित्रमंडळींना, नातेवाईकांना हे समीकरण पाठवून बघा. जेव्हा ते हे पाहून गोंधळतील तेव्हा त्यांना गूगल सर्च करायला सांगा आणि त्याचं उत्तर बघून त्यांच्या चेहर्यावरील आनंद टीपा!
स्वतंत्र्यपूर्व भारतात कृष्ण सागर धरण, भद्रावती आयरन अँण्ड स्टील वर्क्स, मैसूर सैंडल ऑयल अँण्ड सोप फॅक्ट्री, मैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणं ही महत्त्वाची कामं विश्वैश्वरय्या यांनी केली आहेत.