भारतामध्ये इंजिनियर म्हणजेच अभियंता म्हणून काम करणार्‍यांसाठी 15 सप्टेंबर हा दिवस महत्त्वाचा आहे.देशाच्या जडणघडणीमध्ये अभियंता महत्त्वाची भूमिका बजावत असतो. देशात भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस म्हणून हा अभियंता दिवस म्हणून साजरा करतात .