धुंडिराज गोविंद फाळके उर्फ ‘दादासाहेब फाळके’ (1870-1944) म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुंडिराज गोविंद फाळके यांनी भारताला चित्रपटकलेची ओळख करून दिली आणि देशवासीयांसमोर अमर्याद कल्पनेचे द्वार खुले करून दिले. त्यांच्या दूरदर्शी आकांक्षेमुळे, आजच्या भरभराट झालेल्या भारतीय करमणूक उद्योगाची आधारशीला बलवान‌ झाली.आज त्यांची 151 वी जयंती साजरी करण्यात येत आहे.