राज्यात विविध शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नाशिक महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा उद्यापासून येत्या 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.