 
                                                                 नाशिक (Nashik) मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात (City Link Bus Accident) झाल्याची बाब समोर आली आहे. 14 मे च्या रात्री 12 वाजता बस उड्डाणपूलाच्या भिंतीवर आदळली आणि यामध्ये बस चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. मयूर निकम असे जखमी बस चालकाचे नाव आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार 14 मे च्या रात्रू सीएनजी गॅस भरून बस तपोवन बस डेपो मध्ये परत जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती पूलाच्या एका बाजूला भिंतीवर आदळली. यामध्ये बसचे देखील नुकसान झाले आहे. सोबत चालक गंभीर जखमी आहे.
बसमध्ये प्रवासी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे पण चालक गंभीररित्या जखमी आहे. अपघातानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. 13 मे दिवशी देखील सिटी लिंक बसच्या एका चालकाला गाडी चालवत असताना फीट आल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला आणि त्याने पुढील 3 वाहनांना धडक दिली. यामध्ये जिवितहानीचं वृत्त नाही पण गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
13 मे चा नाशिक सिटी लिंक बस अपघात
Maharashtra: A City Link bus in Nashik lost control and collided with three cars. No injuries occurred. The accident caused traffic congestion, and the police are investigating the incident pic.twitter.com/GGy6QBO9Av
— IANS (@ians_india) May 13, 2025
वाहन चालवणाऱ्या चालकांची वैद्यकीय तपासणी वेळोवेळी केली जात आहे का? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
