Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 15, 2025
ताज्या बातम्या
37 minutes ago

Beer Bottle & Cake In Classroom: शासकीय महाविद्यालयात वाढदिवस साजरा करतांना बियरची बॉटल उघडतांना दिसले अल्पवयीन विद्यार्थी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी केली कारवाईची मागणी

व्हायरल Shreya Varke | Feb 14, 2025 01:31 PM IST
A+
A-

Beer Bottle & Cake In Classroom:  मध्य प्रदेशातील मौगंज येथील शासकीय महाविद्यालयामध्ये बियरचे बॉटल घेऊन वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शासकीय हनुमान महाविद्यालयाच्या वर्गात घडलेल्या या घटनेवर नागरिकांकडून तीव्र टीका होत असून विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्याही वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट्समध्ये लोकांनी या कृत्याचा निषेध केला आहे आणि "शाळेत" हे वर्तन  अयोग्य मानले आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही निवेदन दिलेले नसले तरी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी केक कापताना दिसत आहे तर दुसरा बिअरची बाटली उघडत आहे. वर्गात उपस्थित एक शिक्षकही या व्हिडिओत दिसत आहे.

येथे पाहा, व्हिडीओ 

एका युजरने अशा उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर संताप व्यक्त करत शाळेच्या वातावरणाचे पावित्र्य भंग केल्याचा आरोप केला आहे. काहींनी ग्रामीण आणि शहरी भागातील घसरत चाललेल्या नैतिक दर्जाबद्दल उपहासात्मक टिप्पणी केली आहे. या घटनेमुळे सरकारी संस्थांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचे वर्तन आणि उत्तरदायित्व यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

RELATED VIDEOS