Col Sofiya Qureshi | ANI

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court ) भाजप नेते आणि राज्यमंत्री कुंवर विजय शाह ( Minister Kunwar Vijay Shah) यांच्या कर्नल सोफिया कुरेशी (Col Sofiya Qureshi) यांना "दहशतवाद्यांची बहीण" असे संबोधल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध स्वतःहून एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने नमूद केल्यानुसार, भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत प्रथमदर्शनी गुन्हे मंत्र्यांविरुद्ध दाखल केले जावेत. न्यायमूर्ती अतुल श्रीधरन आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणांविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईबद्दल पत्रकार परिषद घेतल्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी 'ऑपरेशन सिंदूर'चा चेहरा बनल्या होत्या. नक्की वाचा: Operation Sindoor च्या ब्रिफिंग देणार्‍या Colonel Sophia Qureshi आणि Wing Commander Vyomika Singh कोण? 

विजय शाह यांनी काल केलेल्या विधानावरून आता वाद निर्माण झाला आहे. यामध्ये त्यांनी "पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या लोकांनी (दहशतवाद्यांनी) आमच्या बहिणींचे सिंदूर पुसले होते ... आम्ही त्यांचा सूड घेण्यासाठी त्यांच्या बहिणींना त्यांना नष्ट करण्यासाठी पाठवलं. त्यांनी (दहशतवाद्यांनी) आमच्या बहिणींना विधवा बनवले, म्हणून मोदीजींनी त्यांच्या समुदायाच्या बहिणीला त्यांचे कपडे काढण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी पाठवले."

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी FIR दाखल केली

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह यांना यांच्या विरोधात मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी FIR दाखल केली आहे. त्यांनी कुंवर विजय शाह यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तसेच 24 तासांत त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही सार्‍या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवू असा इशाराही दिला आहे.