(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

नेटविश्वास प्रचंड लोकप्रिय असलेली व्हिडिओ शेअरींग वेबसाईट युट्यूब अचानक डाऊन झाली. केवळ भारतच नव्हे तर, जगभरातील सर्वच देशांतील YouTube डाऊन झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे युजर्स तर वैतागलेच. पण, काही काळासाठी अफवांचेही पीक जोमाने आले. YouTube डाऊन झाल्यामुळे युजर्स युट्युबवरील व्हिडिओ ना पाहू शकत होते, ना कोणाला शेअर करु शकत होते. त्यामुळे जगभरातील युजर्सनी YouTube वापरताना आलेल्या एररचे स्क्रिनशॉट काढून कंपनीला पाठवत आहेत. दरम्यान, लेटेस्टलीने जेव्हा या प्रकाराची पडताळणी केली तेव्हा, YouTube ठिक असुन, सुरळीत सुरु असल्याचे दिसले.

वृत्तसंस्थात एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, YouTube जगभरात बंद होते. आम्ही जेव्हा या प्रकाराची पडताळणी केली तेव्हा, सुरुवातीची काही मिनीटे YouTube बंद असल्याचे दिसले. मात्र, काही वेळानंतर ते पुर्ववत सुरु झाले. दरम्यान, नेमके कोणत्या कारणामुळे इतकी मोठी घटना घडली हे समजु शकले नाही. मात्र, YouTubeने युजर्सच्या तक्रारी आल्यानंतर ट्विटरवर पोस्ट शेअर करुन सांगितले की, युट्युब, युट्युब टीव्ही आणि युट्युब म्युझिक आदिंवर आलेल्या अडचणी आमच्या पर्यंत पोहोचविल्याबद्दल युजर्सचे आभार. आपली समस्या आम्ही लवकरच दूर करु, सहकार्याबद्दल धन्यावाद. (हेही वाचा, Google+ होणार बंद, तुमचं अकाऊंट डिलिट करताना 'या' गोष्टींचं भान ठेवा !)

दरम्यान, YouTube ही एक अमेरिकन व्हिडिओ शेअरींग वेबसाईट आहे. या कंपनीचे मुख्यालय सॅन ब्रुने, कॅलीफॉर्निया, युनायटेड येथे आहे. फेब्रुवारी २००५मध्ये ही सेवा पहिल्यांदा PayPal मध्ये काम करणाऱ्या तीन लोकांनी सुरु केली. आज या सेवेचा विस्तार जगभरात झाला आहे.