Instagram वर आवडत्या Creator चा कंटेंट पाहण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे; लवकरच येणार Subscription फिचर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: unian.net)

आता इन्स्टाग्राम (Instagram) वापरकर्ते त्यांचे आवडते कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसर्सचा एक्सक्लूझिव्ह कंटेंट पाहण्यासाठी तसेच नव्या फीचर्सला एक्सेस करण्यासाठी सब्सक्राईब करू शकणार आहेत. एका ब्लॉग पोस्टमध्ये, कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. अशाप्रकारे फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसर्ससाठी एक नवीन फीचर तयार करत आहे ज्याद्वारे ते चांगले पैसे कमवू शकतील. अलीकडे व्यासपीठावर पेड सब्सक्रिप्शन (Instagram Paid Subscription) फिचर दिसून आले आहे, जे लवकरच भारतातील वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध होऊ शकते.

या नवीन पेड सबस्क्रिप्शन फिचरमुळे कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसर्सना त्यांच्या खास कंटेंटच्या बदल्यात फॉलोअर्सकडून मासिक शुल्क आकारता येईल. ज्या वापरकर्त्यांनी त्यांच्या आवडत्या कंटेंट क्रिएटर्सची सदस्यता घेतली आहे त्यांना त्यांच्या युजरनेम पुढे पर्पल बॅज मिळेल, तसेच त्यांना विशेष इन्स्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ आणि स्टोरीचाही एक्सेस मिळेल. सध्या अधिकृतपणे, हे फिचर केवळ यूएस मधील विशेष कंटेंट क्रिएटर्ससाठी उपलब्ध आहे, परंतु ते भारतात देखील दिसून आले आहे.

ट्विटर वापरकर्ता सलमान मेमन, @salman_memon_7 याने अलीकडेच शेअर केलेला स्क्रीनशॉट दर्शवितो की, काही कंटेंट क्रिएटर्सना सदस्यता घेण्याचा पर्याय आता भारतीय वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध आहे. सध्या, बास्केटबॉलपटू सेडोना प्रिन्स, ऑलिम्पियन जॉर्डन चिली आणि ज्योतिषी अलिझा केली यांच्यासह दहा कंटेंट क्रिएटर्सना प्रायमरी टेस्टिंगचा भाग बनवण्यात आले आहे. फॉलोअर्सना ते फॉलो करत असलेल्या कंटेंट क्रिएटर्सचा खास कंटेंट पाहण्यासाठी पैसे भरावे लागतील. (हेही वाचा: Twitter युजर्सला सरकारकडून सल्ला, 'या' टिप्स फॉलो केल्यास हॅकिंगला बळी पडणार नाही)

अशाप्रकारे सध्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर दोघेही, OnlyFans ची स्वतःची आवृत्ती तयार करत आहेत. असे अॅप जिथे कंटेंट क्रिएटर्स आपला खास कंटेंट प्रकाशित करू शकतील आणि ज्याद्वारे त्यांना पैसे कमावता येऊ शकतील.