
मोबाईल कंपनी Xiaomi लवकरच जबरदस्त कॅमेरा फिचर असलेला नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 7 पॉप अप कॅमेरे देण्यात आले आहेत. फोटो आणि सेल्फी काढण्याचे वाढते फॅड लक्षात घेता शाओमी हा नवा स्मार्टफोन लवकरच बाजारात आणणार आहे. मात्र हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच या स्मार्टफोनचे फोटो लीक झाले आहेत. हे फोटो पाहून या स्मार्टफोनविषयी ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. शाओमीने आतापर्यंत एकाहून एक सरस असे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. त्यात भर म्हणून हा नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात येऊन धुमाकूळ घालेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
चाइना नॅशनल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशनच्या वतीनं 7 कॅमेरा असलेल्या मोबाईलचं मॉडेल पेटंट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने तीन वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाइन तयार केले आहेत. तीनही डिझाइन दिसायला एकसारखे दिसत असले तरीही यातील कॅमे-याची संख्या वेगळी आहे.
पाहा फोटो:

हेदेखील वाचा- Zanco tiny t2: जगातील सर्वात छोटा 2.4 इंचाचा स्मार्टफोन लाँच; 7 दिवस चालते याची बॅटरी लाईफ, वाचा सविस्तर
शाओमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये फ्रंट ड्युअल सेल्फी कॅमेरा आणि 5 प्रायमरी कॅमे-याची सुविधा मिळणार आहे असे सांगितलं जातय. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की यात 7 कॅमेरा सेंसरही देण्यात आले आहेत.
पहिल्या मॉडेलमध्ये पाहिलं तर 5 कॅमेरा असलेला पॉप अप तर दुसऱ्या मॉडेलमध्ये तीन आणि तिसऱ्या मॉडेलमध्ये 2 पॉपअप कॅमेरा दाखवण्यात आले आहेत. इतर कॅमेरे हे प्रायमरी असतील. यामध्ये किती मेगापिक्सेलपासून सुरुवात असेल याचा फोकल पॉइंट किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र हुआईला टक्क देण्यासाठी आता शाओमी स्पर्धेत उतरणार आहे.