Twitter ला पर्याय म्हणून आलेले Mastodon App भारतात होत आहे लोकप्रिय; अशा पद्धतीने तुमचे अकाउंट
Mastodon & Twitter (Photo Credits: File)

काही वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या महाकाय प्राणी मेस्टोडॉन (Mastodon) याच्या नावाने एक नवीन सोशल नेटवर्किंग सर्विस सध्या भारतात खूप पसंत केली जात आहे. हा Twitter सारखाच एक अॅप असून याला Twitter ला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मागील काही दिवसांत अनेक भारतीय यूजर्स या अॅपशी जोडले गेले आहेत. थोडक्यात त्यांनी यावर आपले नवीन खाते उघडले आहे. मेस्टोडॉनला इंटरनेटच्या जगात ट्विटरचा पर्यायी अॅप म्हणून पाहिले जात असल्याने मेस्टोडॉन हा शब्द ट्विटरवर ट्रेंड सुद्धा होत आहे.

2016 मध्ये मेस्टोडॉनला जर्मनीच्या 26 वर्षीय रोचको ने विकसित केले होते. भारतात अचानक मेस्टोडॉनच्या ट्रेंड होण्यावर त्यांनी आनंद व्यक्त करत 'ही खूप चांगली गोष्ट असून आम्ही त्याचे स्वागत करतो.' असे म्हटले आहे.Twitter वर 22 नोव्हेंबर पासून दिसणार नाही राजकीय जाहिरात

सोशल साइट असूनसुद्धा मेस्टोडॉन ट्विटर आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मपेक्षा एकदम वेगळे आहे. याची काम करण्याची पद्धतही खूप वेगळी आणि हटके आहे. मेस्टोडॉन आपल्या नेटवर्कमध्ये स्वत:च्या सर्वर नोडला होस्ट करण्याची परवानगी देतो.

मेस्टोडॉनवर कसे बनवाल तुमचे अकाउंट?

1. सर्वात आधी त्याच्या अधिकृत वेबसाइट joinmastodon.org वर जा

2. 'Get Started' पर्यायावर क्लिक करा

3. नंतर 'Category' मधील पर्याय निवडा. ज्यात जनरल, आर्ट, टेक्नोलॉजी, फूड यांसारखे पर्याय आहेत.

4. त्यानंतर तुमची आवडती भाषा निवडा

5. मग तुमच्या स्क्रिनवर Category आणि निवडलेल्या भाषेनुसार

एक सर्वर सूची दिसेल. येथे आपल्याला तुमच्या आवडीचे सर्वर निवडून "Join" वर क्लिक करा.

6. येथे तुमच्या युजरचे नाव, ईमेल आयडी, पासवर्ड सारखे अन्य महत्त्वाची माहिती भरा. त्यानंतर 'Sign Up' पर्यायावर क्लिक करा.

शेवटी तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीची पडताळणी केली जाईल. यासाठी तुम्हाला मेस्टोडॉन द्वारा पाठवलेल्या लिंकवर क्लिक करावे लागले. आता तुमचे मेस्टोडॉन अकाउंट वापरण्यास तयार झाले आहे असे समजा.