![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/WhatsApp-Representational-Image-Photo-Credit-Trak-380x214.jpg)
व्हॉट्सअॅप (whatsApp) आपल्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी नवं नवीन फिचर्स घेऊन येत असतो. मात्र आता येणाऱ्या नव्या फिचर्समध्ये 'रँकिंग'(Ranking) नावाचे फिचर लवकरच लॉन्च केले जाणार आहे. त्यामुळे आपल्या मित्राचे स्टेटसबाबत थोडा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर बाबत अद्याप चाचणी सुरु आहे. WABeataInfo यांनी येणाऱ्या या नव्या फिचर संबंधित माहिती दिली आहे. तर व्हॉट्सअॅपवर आपण सर्वात जास्त कोणाशी बोलतो त्यावरुन त्या व्यक्तीचे स्टेटस (Status) प्रथम दिसणार आहे. तसेच स्टेटची क्रमवारी ही ठरविण्यात येणार आहे. तसेच रँकिंग ठरवताना अन्य गोष्टीही लक्षात घेतल्या जाणार आहेत.
व्हॉट्सअॅप रँकिंगनुसार एखादा मेसेज पाठवला किंवा रिसीव्ह केल्यास नॉर्मल रँकिंग (Normal Ranking),फोटो, व्हिडिओ पाठवले किंवा रिसीव्ह केल्यास गुड रँकिंग (Good Ranking) आणि एखादा मेसेज पाहिला न गेल्यास बॅड रँकिंग (Bad Ranking) असे दाखविले जाणार आहे. त्याचसोबत एखाद्या व्यक्तीच्या मेसेजला जास्तीत जास्त रिप्लाय केल्यास त्यानुसारही रँकिंग ठरविण्यात येणार आहे.
तसेच 'ग्रुप इन्विटेशन' हे सुद्धा नवीन फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येणार आहे. त्यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी अॅडमिनची परवानगी घेणे गरजेचे नसणार आहे. तर iOS युजर्ससाठी हे फिचर त्यांच्या Privacy सेक्शन मध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.