WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप ने नवं फीचर  'Message Yourself' लॉन्च करण्याचे केले जाहीर; भारतात होणार लवकरच उपलब्ध
WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

Meta च्या मालकीचं मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp कडून आज (28 नोव्हेंबर) नव्या फीचरची घोषणा करण्यात आली आहे. 'Message Yourself' हे नवं फीचर लवकरच भारतामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही आठवड्यात हे फीचर उपलब्ध होईल. या फीचर द्वारा 1:1 चॅट करता येणार आहे. तुम्ही स्वतःलाच नोट्स, रिमाईंडर, आणि अपडेट्स पाठवू शकाल. कंपनीकडून जारी स्टेटमेंट मध्ये सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप वर युजर्स नोट्स, रिमांईडर्स, शॉपिंग लिस्ट आणी बर्‍याच गोष्टी स्वतःला पाठवू शकतात. नवं फीचर वापरण्यासाठी व्हॉटसअ‍ॅप ओपन करा, नवं चॅट बनवा. टॉप वर असलेल्या कॉन्टॅक्ट्स वर क्लिक करा. स्वतःला निवडा आणि मेसेज करायला सुरूवात करा. हे फीचर अ‍ॅन्ड्रॉईड, आयओएस मध्ये चालणार आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यात तुम्हांला ही फीचर्स वापरता येणार आहे.

महिन्याच्या सुरूवातीला, मेटा फाऊंडर आणि सीईओ Mark Zuckerberg यांनी 'Communities on WhatsApp' जारी केले आहे. तत्पूर्वी एका व्हिडीओ कॉल मध्ये 32 व्यक्तींचा समावेश, इन चॅट पोल्स यांचा समावेश केला आहे.नक्की वाचा: WhatsApp Privacy: गोपनियनतेची मिसाल देणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या 50 कोटी युजर्सचा डेटा लिक, भारतासह इतर 84 देशाच्या युजर्सचा डेटा थेट विक्रीला.

Meta CEO च्या माहितीनुसार, आमच्याकडून Communities लॉन्च करण्यात आल्या आहेत. ज्यात मल्टिपल थ्रेड्स, सब ग्रुप्स, चॅनल्स अनाऊसमेंट करता येतील. लवकरच 32 लोकांचा व्हिडिओ कॉल आणि पोल्सचे पर्याय देखील उपलब्ध होतील. हे सारे end to end encryption ने सिक्युअर केलेले आहे. त्यामुळे तुमचा मेसेज देखील प्रायव्हेट राहतो.