WhatsApp Privacy: गोपनियनतेची मिसाल देणाऱ्या व्हॉट्सअॅपच्या 50 कोटी युजर्सचा डेटा लिक, भारतासह इतर 84 देशाच्या युजर्सचा डेटा थेट विक्रीला
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

सगळ्यात जास्त वापरण्यात येणारा सोशल मिडीया अॅप (Social Media App) म्हणजे व्हॉट्सअप (WhatsApp). फक्त भारतातचं नाही तर व्हॉट्सअपच्या संपूर्ण जगात सर्वात जगात सर्वात जास्त वापरण्यात येणाऱ्या सोशल मिडीया (Social Media) अप्सपैकी एक आहे. व्हॉट्सअप कायमचं आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट घेवून येत असतो. त्याचबरोबर व्हॉट्सअप आपल्या प्रायवसी पॉलिसीबाबत (Privacy Police)  मोठ्या विश्वासाने सांगत असतो. पण सायबर न्युजच्या (Cyber News) एका अहवालाने कोट्यावधी व्हॉट्सअप (WhatsApp) वापरकर्त्यांची झोप उडवली आहे. कारण  सायबरन्यूजच्या एका अहवालानुसार, भारतासह जगभरातील 84 देशांतील ५० कोटी व्हॉट्सअप वापरकर्त्यांचा व्हॉट्सअॅप डेटा लिक (WhatsApp Data Leak) केला गेला असुन तो डाटा विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. तरी हा डेटा नेमका कुणी, कसा, कधी लिक केला याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती जाहिर करण्यात आलेली नाही.

 

सायबर न्यूजच्या (Cyber News) दाव्यानुसार  एका लोकप्रिय हॅकिंग फोरमवर (Hacking Forum) भारतासह 84 देशांतील व्हॉट्सअॅप डेटाबेस (WhatsApp Database)मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या डेटात युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. याशिवाय इजिप्त (Egypt), इटली (Italy), फ्रान्स (France), यूके (UK), रशिया आणि भारतातील लाखो युजर्सचा डेटाही लीक झाला असून, त्याची ऑनलाइन विक्री केली जात आहे.  अहवालात नमुद केल्या प्रमाणे लीक झालेल्या 32 दशलक्षाहून अधिक रेकॉर्ड यूएसमधील वापरकर्त्यांकडून आहेत. तर यूकेतील 11 दशलक्ष डेटा या हॅकरकडे आहे. इतर राष्ट्रांमध्ये इजिप्तच्या 45 दशलक्ष, इटलीतील 35 दशलक्ष, सौदी अरेबिया मधील 29 दशलक्ष, फ्रान्स 20 दशलक्ष, तुर्की 20 दशलक्ष, रशिया 10 दशलक्ष तर तब्बल 6 दशलक्षाहून अधिक भारतीयांचा व्हॉट्सअॅप डेटा हॅक झाल्याच या अहवालात नमूद केले आहे. (हे ही वाचा:- WhatsApp Update: व्हॉट्सअॅप घेवून येणार पुन्हा एक नवा अपडेट, आता विना डिसटर्बन्स करा व्हॉटसअॅप ग्रुपचॅट)

 

व्हॉट्सअॅपने सायबर न्यूजच्या या वृत्ताला स्पष्टपणे फेटाळले आहे. मेटा-मालकीच्या मेसेजिंग अॅप व्हॉट्स अपने स्पष्ट केले आहे की सायबरन्यूजने दिलेल्या वृत्तात वापरकर्ता डेटा WhatsApp वरून घेतला होता हे सिद्ध करण्यासाठी कुठलेही ठोस पुरावे नाहीत. तसेच जर डेटा चोरी झाला असेलही तरी आता पर्यत कुठल्याही व्हॉट्सअप वापरकर्त्याकडून या प्रकारची कुठलीही आक्षेपार्ह तक्रार आलेली नाही. या प्रकारे व्हॉट्सअप कडून सगळे आरोप खोडून काढण्यात आलेत.