WhatsApp Hacking Scams | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सध्या ऑनलाईन घोटाळे वाढत चालले आहेत. यामध्ये फसवणूक करणारे हमखास Video call frauds देखील करतात. आता हा धोका ओळखून व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) कडूनच व्हिडिओ कॉल दरम्यान प्रायव्हसी वाढवण्यासाठी नवं फीचर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या नव्या फीचर मध्ये आता युजर व्हिडिओ कॉल सुरू होण्यापूर्वी त्यांचा कॅमेरा बंद करणार की सुरू ठेवणार? याचा निर्णय घेणार आहेत. ज्यांना केवळ voice-only communication ठेवायचं आहे त्यांना कॅमेरा बंद देखील ठेवता येणार आहे.

प्रायव्हसी फोक्स्ड व्हिडिओ कॉल फीचर

आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर कॅमेरा चालू करायचा की नाही याबद्दल स्पष्टपणे निर्णय घेता येत नाही. नवीन फीचरमुळे हे बदलणार आहे.युजर्सना फसवणुकीपासून वाचवता येईल जिथे व्हिडिओ कॉल सुरू होताच स्नॅपशॉट घेतला जातो आणि नंतर युजर्सना शुल्क भरण्यास भाग पाडण्यासाठी खंडणी म्हणून वापरला जातो.

Android Authority, च्या नव्या अपडेट्सनुसार WhatsApp हा नवा पर्याय beta version 2.25.7.3 मध्ये तपासत आहेत. हे फीचर अ‍ॅपच्या APK teardown मध्ये काम करताना दिसले आहे. एकदा हे फीचर नवीन अपडेटमध्ये आल्यानंतर, यूजर्सना कॉल दरम्यान व्हिडिओ चालू करायचा की बंद करायचा याचा पर्याय असेल. यामुळे त्यांना कॉलला उत्तर दिल्यानंतर लगेच कॉलरकडून व्हिडिओ पाहता येणार नाही. नक्की वाचा: WhatsApp On Spam Call: स्पॅम कॉल्सद्वारे युजर्सची फसवणूक; भारत सरकारच्या कठोर निर्णयानंतर व्हॉट्सअॅपने दिले उत्तर, घ्या जाणून .

फ्रॉड कॉल्स, डिजिटल अरेस्ट, कस्टम मध्ये अडकलेल्या पॅकेजेसचे पैसे देण्यासाठी बेकायदेशीर प्रलोभन हे सध्या सर्रास सुरू असलेले स्कॅम आहेत. संशयास्पद वाटणारे कॉल उचलण्यास टाळणे, फायदे, सवलती, विक्री आणि लकी ड्रॉमध्ये समावेश करण्याऐवजी तुमचे फोन नंबर शेअर करण्यास टाळणे हे तुमचे वैयक्तिक तपशील आणि नंबर लीक होण्यापासून वाचवण्याचे काही मार्ग आहेत.