WhatsApp Pixabay

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) कडून सातत्याने आपल्या युजर्सला टिकवून ठेवण्यासाठी नवनवी फीचर्स रोल आऊट करण्याचे प्रयत्न सुरू असतात. व्हॉट्सअ‍ॅप येत्या वर्षभरामध्ये प्रायव्हसी, मनोरंजनाशी निगडीत अनेक नवनवी फीचर्स घेऊन येण्याच्या विचारामध्ये आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा प्रोगाम मध्ये असलेले अशापैकी एक फीचर म्हणजे स्क्रिन शेअरिंग फीचर (Screen Sharing feature). याद्वारा युजर्सना व्हिडिओ कॉल दरम्यान आपली स्क्रिन शेअर करता येणार आहे. मग पहा या फीचरचा युजर्सना कसा फायदा होणार आहे?

व्हॉट्सअ‍ॅपचं स्क्रीन शेअरिंग फीचर हे गूगल मीट, झूम प्रमाणे आहे. या फीचर द्वारा युजर्सना त्यांची स्क्रीन मीटिंगद्वारा शेअर करता येणार आहे. यामुळे ऑनकॉल प्रेझेंटेशन देणं, फोटो, व्हिडिओ दाखवणं सोप्प होणार आहे.

हे स्क्रीन-शेअरिंग फीचर देऊन WhatsApp स्वतःला Google Meet आणि Zoom सारख्या अॅप्सच्या तुलनेत स्वतःला उत्तम पर्याय बनवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.   WhatsApp Edit Message: आता व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज एडीट करता येणार; नवीन फीचर जारी, जाणून घ्या सविस्तर .

कसं वापरू शकाल हे फीचर?

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि बॉटम टॅब कडे जा.
  • कॅमेरा स्विच ऑप्शन जवळ नवा पर्याय दिसेल.
  • आता स्क्रिन शेअर फीचर च्या आयकॉन वर क्लिक करा.
  • एक पॉप अप बॉक्स ओपन होईल. त्यानंतर "Start Now" वर क्लिक करून तुमची स्क्रिन शेअर करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
  • "You're sharing your screen,"असा मेसेज तुम्हांला दिसेल म्हणजे तुम्हांला समजेल की आता प्रक्रिया सुरू झाली आहे.

तुमच्या आवडीनुसार कधीही रेकॉर्डिंग बंद करता येईल. स्क्रिन शेअर निवडण्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप नक्कीच तुमची परवानगी मागेल. स्क्रिन शेअर च्या वेळी व्हॉट्सअ‍ॅप सारी माहिती अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी मागेल. यामध्ये पासवर्ड्स, फोटोज, मेसेज आणि पेमेंट डिटेल्सचा देखील समावेश असणार आहे.