WhatsApp Payments Background Feature (Photo Credits: WhatsApp)

फेसबूकच्या  (Facebook) मालकीचं व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) कडून आता अजून एक नवं फीचर लॉन्च करण्यात आलं आहे. Payments Background असं त्याचं नाव आहे. या द्वारा व्हॉट्सअ‍ॅपने पैसे पाठवताना युजर्सना आता बॅकग्राऊड ठेवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना अ‍ॅन्ड्रॉईड (Android ) आणि आयओएस (iOS) अशा दोन्हीवर हे नवं फिचर वापरता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप द्वारा पैसे पाठवताना युजर्सना 7 बॅकग्राऊंड्स ची लिस्ट आता पाहता येणार आहे. अशाप्रकारचं फीचर गूगलच्या गूगल पे ऑनलाईन मनी ट्रान्सफर अ‍ॅप मध्ये देखील आहे. (नक्की वाचा: WhatsApp Pay म्हणजे काय? या नव्या फिचरचा वापर करुन पैशांची देवाण-घेवाण कशी कराल? जाणून घ्या).

कसं वापराल फीचर?

  1. स्मार्टफोन मध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. त्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचं चॅटबॉक्स ओपन करा.
  2. टेक्स्ट बॉक्स मध्ये उजव्या बाजूला असलेल्या 'Attachment Icon'वर टॅब करा.
  3. पेमेंट चा पर्याय निवडून जितकी रक्कम आहे तितकी तिथे समाविष्ट करा.
  4. बॅकग्राऊंड बदलण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या थ्री स्टार आयकॉन वर क्लिक करा. नंतर तुम्हांला बॅकग्राऊंडचे पर्याय दिसतील.
  5. तुमच्या पैशांच्या व्यवहारासाठी जो पर्याय योग्य वाटेल तो निवडा.

आर्थिक व्यवहारासाठी कारण लिहण्याची देखील सोय देण्यात आली आहे. तुमच्याकडून व्यवहार पूर्ण झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला पैसे किती, कारण आणि बॅकग्राऊंड देखील पाहता येणार आहे.