WhatsApp Pay म्हणजे काय? या नव्या फिचरचा वापर करुन पैशांची देवाण-घेवाण कशी कराल? जाणून घ्या
WhatsaApp (Photo Credits: Pxfuel)

व्हॉट्सअॅप पे (WhatsApp Pay) हे इन-चॅट फिचर (In-Chat Feature) असून याद्वारे युजर्संना पैशांची देवाण-घेवाण करणे शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे युजर्स आपल्या कॉन्टॅट लिस्ट (Contact List) मधील व्यक्तींना पैसे पाठवू शकता. दरम्यान, व्हॉट्सअॅपवर मेसेज प्रमाणेच पैसे पाठवणेही युजर्ससाठी अगदी सहज शक्य व्हावे, असा हेतू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. व्हॉट्सअॅपने त्यांचे पेमेंट फिचर नॅशनल पेमेंट्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) सोबत भागीदारी करुन डिझाईन केले आहे. यासाठी त्यांनी UPL चा वापर केला आहे. (Mark Zuckerberg On WhatsApp Pay: 'व्हॉट्सअॅप पे' करिता कंपनी युजर्सकडून शुल्क आकारणार का? मार्क झुकरबर्ग यांनी दिलं 'हे' उत्तर)

व्हॉट्सअॅप पे वापरण्यापूर्वी जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी:

# व्हॉट्सअॅपने 5 आघाडीच्या बँकांसोबत टायअप केले आहे. यात ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, The State Bank of India आणि Jio Payments Bank या बँकांचा यामध्ये समावेश आहे.

# व्हॉट्सअॅपद्वारे पैसे पाठवण्यासाठी तुमच्याकडे बँक अकाऊंट आणि डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे.

# व्हॉट्सअॅप पे द्वारे पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीकडे UPI युक्त अॅप असणे गरजेचे आहे.

# भारतात व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या सर्वाधिक आहे आणि फेसबुकच्या दृष्टीने भारत हा खूप महत्त्वाचा देश आहे. त्यामुळेच व्हॉट्सअॅप मध्ये युजर्सची संख्या वाढवण्यासाठी हे नवे फिचर लॉन्च करण्यात आले आहे.

# व्हॉट्सअॅपच्या या नव्या सेवेला NPCI कडून मान्यता मिळाली असून 2 वर्षांच्या टेस्टिंगनंतर या सेवेला मंजूरी मिळाली आहे.

WhatsApp Pay म्हणजे काय?

जगातील सर्वात मोठ्या ओपन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिस सुरु करण्याची परवानगी भारताने फेसबुकला दिली आहे. व्हॉट्सअॅप पे ची सर्व्हिस वापरण्यासाठी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्याही एका व्यक्तीला पैसे पाठवणे गरजेचे आहे. ही रिक्व्यूस्ट रिसिव्ह झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर तुम्ही तुमचे UPI अकाऊंट सेटअप करु शकता.

WhatsApp Pay चा वापर कसा कराल?

व्हॉट्सअॅप पे द्वारे पैसे पाठवण्यासाठी त्या व्यक्तीच्या चॅटमध्ये जा. त्यानंतर शेअर फाईल आयकॉन वर क्लिक करुन ‘payment’ऑप्शन सिलेक्ट करा. व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर आणि IFSC Code न वापरता तुम्ही त्याला पैसे पाठवू शकता, तुमच्या व्हॉट्सअॅप कॉन्टट लिस्टमधील ज्या व्यक्तींना व्हॉट्सअॅप पेमेंट्ससाठी रजिस्टर केले आहे. अशाच व्यक्तींना तुम्ही पैसे पाठवू शकता. रजिस्टर न केलेल्या युजरला तुम्ही पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला तर त्या युजरला व्हॉट्सअॅप पेमेंटसाठी रजिस्टर करण्याचा मेसेज जाईल.

या नव्या फिचरद्वारे पैसे ट्रान्सफर करणारे अॅप पेटीएम (Paytm), फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) यांच्या स्पर्धेत आता व्हॉट्सअॅप पे (WhatsApp Pay) देखील उतरले आहे.