WhatsApp Chats होत आहे लीक; तुमच्याबाबतही घडू शकतो हा प्रकार, 'या' सोप्या उपायांनी ठेऊ शकता व्हॉट्सअ‍ॅपवरील संवाद सुरक्षित
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

सध्या एनसीबी (NCB) कडून विविध सेलेब्जची चौकशी सुरु आहे. यामध्ये लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स (WhatsApp Chat) लीक (Leak) झाल्याचे आपण वाचत आहोत. दीपिका पदुकोणचेही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स लीक झाल्याने ती या प्रकरणामध्ये गुंतली. यासह इतर अनेक सेलिब्रिटी लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्ससुद्धा लीक झाल्याचे आपण ऐकले असेल. व्हॉट्सअ‍ॅपने याधीही दावा केला आहे की, व्हॉट्सअ‍ॅप वरील चॅट्स या एंड टू एंड एन्क्रिप्शन वाले आहेत. हे चॅट्स सेन्सर आणि रिसिव्हरसोडून इतर कोणीही वाचू शकत नाही, खुद्द स्वतः व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा नाही.

मात्र तरीही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स लीक होत आहेत व कदाचित हीच वेळ तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स लीक होण्यापासून कसे वाचविले पाहिजे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला याच बाबत माहिती देणार आहोत. व्हॉट्सअ‍ॅपवरून डायरेक्ट चॅट नाही, तर इनडायरेक्ट चॅट लीक होऊ शकते. बराच काळापर्यंत आपल्याला या गोष्टीची कल्पनाही असू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप वरील चॅट्स या एंड टू एंड एन्क्रिप्शनचे आहेत, परंतु कंपनीने याआधी स्पष्ट सांगितले आहे की, याचा बॅकअप एंड टू एंड एन्क्रिप्टेड नसतो.

iCloud आणि Gmail Drive वर व्हॉट्सअ‍ॅपचे चॅट बॅकअप असते. आयफोन वापरकर्त्यांसाठी आयक्लाउड, तर अँड्रॉइड वापरकर्त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप जीमेल ड्राईव्हवर जातो. मात्र हे स्पष्ट आहे की बॅकअप चॅट्स एन्क्रिप्टेड नसतात त्यामुळे हे धोकादायक आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींग्सवर जाऊन आपण चॅट बॅकअप बंद करू शकता. जर काही महत्वाच्या चॅटचा बॅकअप घ्यायचा असेल तर, आपण ईमेलवर विविध चॅट एक्स्पोर्ट करू शकता. यानंतर, आपण आपल्या संगणकावर हे डाउनलोड करून ते नंतर हटवू शकता. यामुळे आपला बॅकअप देखील आपल्याकडे राहील आणि क्लाउडवरून चॅट लीक होण्याची भीतीही नसणार.

आपल्याला क्लाउडमध्ये आपल्या चॅटचा बॅकअप घ्यायचा असेल तर, आपला क्लाउड ड्राइव्ह सुरक्षित ठेवणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. यासाठी, आपल्याला एक योग्य पासवर्ड ठेवणे गरजेचे आहे. (हेही वाचा: कमी पैशांच्या Recharge मध्ये सुद्धा वापरता येईल WhatsApp, डेटा संपण्याची चिंता दूर करण्यासाठी फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा)

आपणास आपल्या क्लाउडवरून व्हॉट्सअ‍ॅपचा बॅकअप हटवायचा असेल तर आपल्याकडे तोही चांगला पर्याय आहे. यासाठी आपण आपल्या जीमेल आयडीने गुगल ड्राईव्हवर लॉग इन करू शकता आणि व्हॉट्सअॅप फोल्डरवर जाऊन तिथून आपण व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप फाईल हटवू शकता.

तर अशा प्रकारे मित्रांनो व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करतान थोडी काळजी घेतली व काही सोप्या ट्रिक्सचा वापर केलात तर, तुमचे चॅट सुरक्षित राहू शकते.