Whatsapp ने युजर्ससाठी आणली 'ही' पाच नवी फीचर्स, आता चॅटिंग होणार आणखीन सोयीस्कर
Whatsapp (Photo Credits: Trak)

फेसबुक (Facebook) चं प्रसिद्ध मोबाईल मेसेजिंग ऍप व्हॉट्सअॅप (Whatsapp) ची लोकप्रियता पाहता आज जगात हे ऍप न वापरणारी मंडळी जरा दुर्मिळच आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या इतक्या विस्तरित युजर्स वर्गासाठी ही कंपनी नेहमीच नवनवे फिचर्स (NewFeatures) सादर करत असते. यामध्ये आता आणखी नवे 5 फीचर्स येत्या काळात सुरु करण्यात येणारअसल्याचे समजत आहे. या बदलांमुळे ग्राहकांना आपले संपर्क व मॅसेजेस सांभाळण्यात मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चला तर मग पाहुयात काय असणार आहेत हे नवे फीचर्स...

डार्क मोड

कित्येक जण दिवसरात्र कायम या ऍपचा वापर करत असतात मात्र यामुळे डोळ्यांवर तणाव येऊन त्रास होऊ शकतो. हा त्रास टाळण्यासाठी डार्क मोड हे नवे फिचर आणले जाणार असल्याचे कित्येक दिवसांपासून सांगितले जात होते. आपल्या ऍप सेटिंग्समधून डार्क मोड चालू केल्यावर व्हॉट्सअॅपमधलं बॅकग्राउंड राखाडी रंगाचं दिसू लागेल. तसंच, चॅट आयकॉन्स व नावं हिरव्या रंगात दिसू लागतील. यामुळे रात्रीच्या अंधारात मोबाईल प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास

कमी होईल. WhatsApp Tricks: व्हॉट्सअॅप मेसेज शेड्युल करा, झोपी जा! बर्थडे शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12 पर्यंत जागण्याची गरज नाही

फुल साइज इमेज

व्हॉट्सअॅपवरून फोटो पाठवताना त्या फोटोचा दर्जा आणि त्याचं रिसोल्यूशन कमी होतं. त्यामुळे यूजर्स फोटो शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅप ऐवजी अन्य अॅप्सचा वापर करतात. पण आता व्हॉट्सअॅपमध्ये होणाऱ्या बदलामुळे फोटो पाठवताना फुल साईज इमेजचा पर्याय निवडल्यास फोटोचा दर्जा आहे तसा टिकून राहण्यास मदत होईल.

क्रॉस प्लॅटफॉर्म बॅकअप

या ऍप मधील डेटा सुरक्षित राहावा यासाठी बॅकअपचा पर्याय दिलेला आहे. पण आपणास फोन बदलून अँड्रॉइड मधून आयओएस मध्ये जायचे असल्यास बॅकअपचा वापर करता येत नाही. मात्र आता या नवीन फिचरमुळे एका प्लॅटफॉर्म मधून दुसऱ्या प्लॅटफॉर्म मध्येही डाटा बॅकअप करणे सहज शक्य होणार आहे.

इन ऍप ब्राउझर

तुम्हाला कोणी व्हॉट्सअॅपवर एखादी लिंक पाठवली असल्यास आता ऍप बंद करून ब्राउझिंग करण्याची गरज नाही तुम्ही या फिचर मुळे ऍप मध्येच तुम्ही लिंक उघडू शकता. विशेष म्हणजे तुम्ही या अंतर्गत सर्च केलेल्या गोष्टींची यादी फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर संग्रहित राहणार नाही. WhatsApp Update : आता व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये प्रायव्हेट रिप्लाय करण्याची सोय !

व्हॉट्सअॅप पे

गुगल पे, फोन पे सारखं अर्थिक व्यवहाराची सुविधा 'व्हॉट्सअॅप पे' उपलब्ध करून देईल. पैसे पाठवणे, बिल भरणे, रिचार्ज करणे आणि सोबतच चॅटही करणं असं सगळं एकाच अॅपमध्ये आल्यावर यूजर्सना वेगवेगळ्या ऍपची गरज उरणार नाही