Koo App (Photo Credits: Rabish Chandra/ Twitter)

सध्या तुम्ही कू अ‍ॅपची ( Koo App) खूप चर्चा ऐकली पाहिली असेल. अनेक सरकारी मंत्रालय, विभागाकडून कू अ‍ॅप वर अकाऊंट्स बनवली जात आहेत. त्यामुळे सहाजिकच अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल नेमकं कू अ‍ॅप म्हणजे आहे काय? पण कू देखील ट्वीटर (Twitter)  प्रमाणे मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. 10 महिन्यांपूर्वी ते भारतीयांना ट्वीटर साठी पर्याय म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. यावरही अनेक आवडीच्या विषयानुसार आपली मतं मांडण्यासाठी खास सोय आहे. युजर्स यावर फोटो, व्हिडिओ, ऑडिओ शेअर करू शकतात. ट्वीटर प्रमाणेच एकमेकांशी खाजगी संभाषणासाठी डीएम (DM) देखील देण्यात आला आहे.

Koo app ने ऑगस्ट 2020 मध्ये भारत सरकारकडून आयोजित Aatmanirbhar App Challenge जिंकले आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निर्मिती Aprameya Radhakrishna आणि Mayank Bidawatka यांनी मार्च 2020 मध्ये केली आहे. दरम्यान कू अ‍ॅप वापरण्यासाठी 'मन की बात' च्या एका कार्यक्रमामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन देखील केले आहे. (नक्की वाचा: मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ला टक्कर देणार स्वदेशी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप Sandes).

 Koo App फीचर्स 

कू अ‍ॅप भारतीय भाषांना देखील सपोर्ट करते. तसेच या अ‍ॅपवर तुम्ही सहज भारतीय भाषांमध्ये लिहू देखील शकता. हे अ‍ॅप हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी भाषेला देखील सपोर्ट करतं. दरम्यान कू अ‍ॅप वर कॅरेक्टर लिमिट हे 400 आहे .तर व्हिडिओ तुम्ही मिनिटाभरासाठी म्हणजे 60 सेकंद पर्यंतचा अपलोड करू शकता.

कू अ‍ॅप डाऊनलोड साठी गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वर उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या आयफोन किंवा अ‍ॅन्ड्रॉईड डिव्हाईस मध्ये तुम्ही सहज ते डाऊनलोड करून वापरू शकता. कू अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड वर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा तर अ‍ॅपल युजर्सना या डिरेक्ट लिंक वर हे अ‍ॅप डाऊनलोडसाठी मिळू शकतं.