वोडाफोन कंपनीने आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठी एक नवा आणि आकारशक प्लॅन आणला आहे. हा नवा प्लॅन मासिकरीत्या 999 रुपयांना उपलब्ध होणार असून Vodafone RedX असं या प्लॅनचं नाव आहे.
विशेष म्हणजे वोडाफोनच्या या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 टक्के वेगवान इंटरनेट स्पीड मिळेल असा कंपनीने दावा केला आहे. या प्लॅनची आणखी खासियत म्हणजे 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि इंटरनेट डेटासह दररोज 100 विनामूल्य एसएमएस करता येणार आहेत.
तसेच आंतरराष्ट्रीय रोमिंग बेनिफिट्सही या प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय रोमिंग अंतर्गत वापरकर्त्यांना त्यांच्या 7 दिवसांच्या परदेश दौर्यावर विनामूल्य कॉलिंग आणि डेटा देण्यात येत आहे.
वोडाफोनच्या या प्लॅनची सर्वात मोठी डील म्हणजे युजर्सना जगभरातील अनेक विमानतळांवर ऍक्सिस मिळेल, हँडसेटवर विशेष डील, हॉटेल बुकिंगवरील सवलत आणि बरेच काही मिळणार आहे.
या प्लॅनचे इतर बेनिफिट्स
नेटफ्लिक्सचं वार्षिक सब्स्क्रिप्शन.
ऍमेझॉन प्राइम आणि झी 5 वर विनामूल्य सदस्यता मिळेल
वोडाफोन प्ले सेवा विनामूल्य
1 डिसेंबर पासून सॅमसंग सोबत 'या' स्मार्ट टीव्ही मध्ये Netflix दिसणार नाही
परंतु वोडाफोन कंपनीने या प्लॅनवर काही अटी देखील घातल्या आहेत. कंपनी प्रथम येणार्यास प्रथम सेवा या तत्वावर हा प्लॅन देणार असून जे ग्राहक या प्लॅनसाठी बुकिंग करतील ते नंतर रद्द करू शकणार नाहीत. तसेच जे युजर्स कमीतकमी 6 महिन्यांसाठी हा प्लान सबस्क्राइब करतील, त्यांनाच या प्लानचे बेनिफिट मिळतील. आणि जे यूजर हा प्लान 6 महिन्यांआधी सोडतील त्यांना कंपनीला 3000 रुपये द्यावे लागतील.