
टेलिकॉम सर्विस Vodafone-Idea हे एकत्रित आले आहेत. या दोघांचे रीब्रँन्डिंग झाल्यानंतर 5 नवे प्लॅन ओटीटी प्लॅटफॉर्म करिता G5 चे वर्षभरासाठी सब्सक्रिप्शन देणार आहे. कंपनीने या प्लॅन्सबद्दल शनिवारी घोषणा केली. त्यामध्ये युजर्सला प्री-प्रेड प्लॅनवर फ्री G5 चे वर्षभरासाठी सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या प्लॅन्समध्ये 355 रुपये, 405 रुपये, 595 रुपये, 795 रुपये आणि 2595 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. G5 प्रीमियम मेंबरशिपमध्ये युजर्सला 12 भारतीय चित्रपट आणि मूव्ही शो चा आनंद घेता येणार आहे.(VI, टेलिकॉम कंपन्या Vodafone-Idea ची नवी Brand Identity; ग्राहकांना आता myvi.in वर केलं रिडिरेक्ट)
VI च्या काही निवडक प्लॅन्सवर युजर्सला G5 चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना चित्रपट पाहण्यासह डेटा आणि कॉलिंगच्या सुद्धा सुविधेचा भरपूर लाभ घेता येणार आहे. तर जाणून घ्या कोणते आहेत ते प्लॅन्स.(Vodafone Idea ने लॉन्च केला 351 रुपयांचा नवा Work From Home प्लॅन, युजर्सला 100GB डेटाचा घेता येणार लाभ)
-355 रुपयांच्या प्री-पेड प्लॅन 28 दिवसांची वॅलिडिटीसह येणार आहे. या प्लॅनमध्ये 50GB डेटा ऑफर केला जात आहे.
-405 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला वर्षभरासाठी G5 सब्सक्रिप्शनसह 28 दिवसांची वॅलिटिडी मिळणार आहे. तसेच 90GB डेटा ही ऑफर केला जात आहे. त्याचसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS दररोज पाठवता येणार आहेत.
-595 रुपयांचा प्री-पेड प्लॅनवर G5 चा वर्षभरासाठी सब्सक्रिप्शन दिला जाणार आहे. त्याचसोबत 56 दिवसांची वॅलिडिटीसह दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दरदिवसाला 100SMS ची ऑफर दिली जाणार आहे.
-795 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनवर प्रत्येक दिवशी 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS दिले जाणार आहेत. त्याचसोबत 5G चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅनची वॅलिडिटी 84 दिवसांची आहे.
-2595 रुपायांचा प्री-पेड प्लॅन 365 दिवसांची वॅलिडिटीसह येणार आहे. यामध्ये 2GB डेली डेटा लिमिटसह अनलिमिडेट कॉलिंगची ऑफर दिली जाणार आहे. तसेच मिळणार असून 5G सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे.
Vodafone-Idea कडून दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत 109 रुपये आणि 169 रुपयांचे दोन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले होते. यामध्ये युजर्सला 20 दिवसांच्या वॅलिडिटीमध्ये अनलिमिटेड टॉक टाइम ऑफर दिला जात आहे.