VI, टेलिकॉम कंपन्या Vodafone-Idea ची नवी Brand Identity; ग्राहकांना आता myvi.in वर केलं रिडिरेक्ट
Vodafone and Idea New Website (Photo Credits: myvi.in)

टेलिकॉम कंपन्यांमध्ये वाढत्या स्पर्धा पाहता आता Vodafone-Idea ची नवी Brand Identity ही VI म्हणून आज जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आता दोन्ही कंपन्यांकडून प्रीपेड आणि पोस्ट पेडचे नवे प्लॅन्स जाहीर होण्याची शक्यता आहे. Vodafone Idea चे मॅनेजिंग डिरेक्टर CEO रविंदर ठक्कर (Ravinder Takkar)यांनी आज ब्रॅन्ड रिबॅन्डिंगची माहिती दिली आहे. दरम्यान व्होडाफोन, आयडिया च्या ग्राहकांना आता नव्या myvi.inया वेबसाईटवर रिडिरेक्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या नावाचं पहिलं अक्षर घेऊन VI हे बनवण्यात आलं असलं तरीही त्याचा उच्चार WE म्हणजेच आपण असा होत आहे. त्यामुळे कंपनीचं रिब्रॅन्डींग करताना भारतीय संस्कृतीमधील एकोपा आणि एकत्र वाढ असा आशय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान ऑगस्ट 2018 साली व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्या एकत्र आल्या होत्या. आतापर्यंत त्यांची ओळख त्यांनी स्वतंत्रपणे जपली होती. दरम्यान व्होडाफोन आणि आयडियाचं एकत्र येणंं  ही जगातील मोठी एकत्र भागीदारी असल्याचा दावा व्होडाफोनकडून करण्यात आला आहे. आता हे 408 million subscribers चे टेलिकॉम नेटवर्क बनलं आहे.

दरम्यान ही भागीदारी केवळ जगातील सर्वात मोठं नेटवर्कसाठी नाही तर सुमारे  1 बिलियन भारतीयांना 4जी नेटवर्कचा  उत्तर डिजिटल अनुभव देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असेल असा विश्वास देखील वर्तवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम कंपन्यांना adjusted gross revenue चे उरलेले पैसे भरण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी दिला आहे. आज व्होडाफोनने नवी घोषणा केल्यानंतर शेअर मार्केटमध्येही त्यांचे भाव वधारले आहेत.