Vodafone and Idea New Website (Photo Credits: myvi.in)

कोरोना व्हायरसमुळे सध्या बहुतांश कंपन्या अद्याप वर्क फ्रॉम होमच्या नियमाचे पालन करत आहेत. त्यामुळे नागरिक सध्या घरातूनच ऑफिसची कामे पार पाडत आहेत. परंतु घरुन काम करताना युजर्सचा इंटरनेट डेटा (Internet Data) अधिक खर्चिक होतो. याच कारणामुळे टेलिकॉम कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचे प्लॅन (Work From Home Plan) बाजारात आणले आहेत. तर युजर्सला उत्तम सुविधा देण्यासाठी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea म्हणजेच Vi ने नवा प्लॅन वर्क फ्रॉम होम प्रीपेड प्लॅन बाजारात उतरवला आहे. तर वोडाफोन आयडियाच्या या नव्या प्लॅनबद्दल येथे अधिक जाणून घ्या.(VI, टेलिकॉम कंपन्या Vodafone-Idea ची नवी Brand Identity; ग्राहकांना आता myvi.in वर केलं रिडिरेक्ट)

Vi च्या नव्या प्लॅनची किंमत 351 रुपये आहे. याची माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. कंपनीचा हा वर्क फ्रॉम होम प्लॅन असून त्यामध्ये युजर्सला 100GB चा हाय-स्पीड डेटाचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची वॅलिडिटी 56 दिवसांची आहे. नव्या वर्क फ्रॉम होम प्लॅनसह कंपनीने 251 रुपयांना वर्क फ्रॉम प्लॅन सुद्धा उपलब्ध करुन दिला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 28 दिवसांची वॅलिडिटीसह 50GB डेटाची सुविधा मिळणार आहे.(Vodafone Idea New Plans: वोडाफोन-आयडियाने ग्राहकांसाठी आणले दोन स्वस्त प्लान; 'हे' बेनिफिट मिळणार)

कंपनीचा नवा वर्क फ्रॉम होम प्लॅन काही निवडक ठिकाणीच उपलब्ध करुन दिला आहे. दिल्ली, आँध्र प्रदेश, गुजरात, केरळ आणि मध्य प्रदेशात या प्लॅनचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. त्यामुळे घरातून काम करणाऱ्या युजर्ससाठी हा ऑप्शन उत्तम आहे. युजर्सला 351 रुपयांच्या वर्क फ्रॉम होम प्लॅनमध्ये फक्त डेटाची सुविधा दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त कॉलिंग किंवा एसएमएस सारखे ऑप्शन मिळणार नाही आहेत. कॉलिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युजर्सला वेगळा रिचार्ज करावा लागणार आहे.