Vodafone Idea company (PC - Wikimedia Commons )

Vodafone Idea New Plans: टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि आयडियाने आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी दोन स्वस्त प्लान आणले आहेत. यातील पहिला प्लान हा 109 रुपयांचा आहे. तर दुसरा प्लान 169 रुपयांचा आहे. हे दोन्ही प्लान केवळ दिल्ली सर्कलसाठी आहेत. तसेच या दोन्ही प्लानची वैधता 20 दिवसांची असणार आहे.

ग्राहकांना 109 रुपयांच्या रिचार्जमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, सर्व नेटवर्कला स्थानिक आणि राष्ट्रीय कॉल, 300 एसएमएस आणि 1 जीबी डेटा लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्समध्ये Vodafone Play आणि ZEE5 अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शनचादेखील समावेश आहे.

दरम्यान, व्होडाफोन आयडियाचा दुसरा प्लान 169 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये दररोज 1 जीबी डेटाची तरतूदीसह अमर्यादित व्हॉईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस संदेश देण्यात येतील. ही योजना 20 दिवसांसाठी वैध असेल. तसेच अतिरिक्त बेनिफिट्समध्ये युजर्संना Vodafone Play आणि ZEE5 अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात आले आहे. (हेही वाचा - Jio Fiber Free Trial Plan: जिओ फायबर अनलिमिटेड फ्री ट्रायल प्लान घोषीत; वैधता, दर आणि स्पीड घ्या जाणून)

या व्यतिरिक्त, व्होडाफोन आयडियाने दिल्ली मंडळामध्ये 46 रुपयांच्या योजनेचे व्हाउचर देखील आणले आहे, जे सुरुवातीला केरळ मंडळासाठी सादर केले गेले होते. या योजनेंतर्गत, वापरकर्त्यांना 28 दिवसांकरिता 100 स्थानिक ऑन-नेट रात्री दिली जाईल. ग्राहकांना या प्लानचा रात्री 11 ते 6 या काळात लाभ घेता येतो. यात दिवसाला दर सेकंदाला अडीच पैसे किमतीच्या स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलचा समावेश आहे.