Vodafone Idea, Airtel च्या सेवा आजापासून महागणार पण 'या' युजर्सना कॉलिंग, डाटा प्लॅन्सच्या दरवाढीचे टेन्शन नाही!

व्होडाफोन- आयडिया (Vodafone Idea) आणि एअरटेल (Airtel) कंपनीने आजपासून त्यांच्या टॅरिफ शुल्कात वाढ केल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मात्र, हे टॅरिफ शुल्क केवळ प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांसाठी असून पोस्ट पेड ग्राहकांच्या टॅरिफ दरावर कोणताही परिणाम होणार नाही. रिलायन्स जिओ बाजारात दाखल झाल्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांना टाळे लगावले आहेत. एवढेच नव्हेतर, भारतात अधिक प्रसिद्धी मिळवणारे व्होडाफोन-आयडिया कंपनीला एकत्रित यावे लागले आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या तुलनेत रिलायन्स जिओचे ग्राहक अधिक आहेत. परंतु, रिलायन्स जिओदेखील त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल करणार असून यामुळे कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. नवे टॅरिफ प्लॅन 3 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. महत्वाचे म्हणजे, पोस्ट पेड ग्राहकांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये कोणताही बदल करण्यात अला नसून प्रीपेड ग्राहकांनाच अधिक पैसे मोजावे लागणार आहे. पोस्ट पेड ग्राहकांना 1 महिन्याचा रिचार्च करण्यासाठी 499 रुपये द्यावे लागणार आहेत. व्होडाफोन-आयडिया यांच्यासह रिलायन्स जिओनेदेखील त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या शुल्कात 40 टक्क्यांनी वाढ करणार आहेत. तसेच प्रीपेड ग्राहकांसाठी येत्या 6 डिसेंबरपासून नवे प्लॅन लागू केले जाणार आहेत. हे देखील वाचा- स्मार्टफोनला आग लागण्याच्या दुर्घटनेपासून दूर राहण्यासाठी 'या' पद्धतीने घ्या खबरदारी

यापुढे व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल यांनी आऊट गोइंग कॉल्ससाठी मर्यादा ठेवली आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपनी व्यतिरीक्त ग्राहक इतर कोणत्या ग्राहकांशी संपर्क करत असेल तर, त्याला 28 दिवसांसाठी केवळ 1000 आणि 84 दिवसांसाठी 3000 तर एका वर्षाच्या प्लॅनसाठी 12 हजार मिनिटे देण्यात येणार आहेत. मिनिटांची मर्यदा समाप्त झाल्यानंतर ग्राहकांना 6 पैसे/ मिनिट दराने पैसे आकरले जाणार आहेत.