Vivo Y52s चे नवे वर्जन लॉन्च, ग्राहकांना मिळणार धमाकेदार फिचर्स
Vivo (Photo Credit: Twitter)

चीनची  (China) स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo कडून आपला नवा स्मार्टफोन Vivo Y52s (T1 Version) लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी साइड-माउटेंड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे. या व्यतिरिक्त युजर्सला विवो वाय52एस (टी1 वर्जन) मध्ये एचडी डिस्प्ले, Snapdragon 480 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे.(Redmi Note 10S स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लॉन्च, कंपनीने केला खुलासा)

विवो वाय52एस स्मार्टफोन डुअल सिम सपोर्टसह येणार आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित Origin OS 1.0 वर काम करणार आहे. तसेच फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 1080X2408 पिक्सल आहे. त्याचसोबत यामध्ये उत्तम परफॉर्मेन्ससाठी Snapdragon 480 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिला गेला आहे. कंपनीने Vivo Y52s (T1 Version) मध्ये उत्तम परफॉर्मेन्ससाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये पहिला 48MP चा प्रायमरी कॅमेरा सेंसर आणि दुसरा 2MPचा डेप्थ सेंसर दिला आहे. तर याच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.(धमाकेदार स्मार्टफोन Oppo A 53 अडीच हजारांनी झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर)

या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जो 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. तसेच 5g, 4G, LTE, वायफाय, ब्लुटूथ, 5.1, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले गेले आहेत.विवो वाय52एस (टी1 वर्जन) ची किंमत 2,099 चीनी युआन जवळजवळ 23,900 रुपये आहे. याच्या किंमतीमध्ये 8GB रॅम+256GB स्टोरेज वेरियंट मिळणार आहे. हा स्मार्टफोन  Coral Sea, Monet आणि Titanium Grey रंगात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सध्या ही माहिती मिळालेली नाही की विवओ वाय52एस (टी1 वर्जन) भारतासह अन्य देशात कधी लॉन्च केला जाणार आहे.