धमाकेदार स्मार्टफोन Oppo A 53 अडीच हजारांनी झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
Oppo (Photo Credit: Oppo )

OPPO A53 price In India Slashed By Up To Rs 2,500 In Offline Stores: ओप्पो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन ओप्पो ए 53 स्वस्त झाला आहे. ओप्पो ए 53 गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लॉन्च झाला होता. याच स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. ओप्पो ए 53 स्मार्टफोन होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ग्रेडिअंट बॅकपॅनल डिझाइनसोबत येतो. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, ऑक्टा-कोर प्रोसेसर, रिअर फिंगरप्रिंट सेन्सर आणि दमदार बॅटरीसह अनेक शानदार फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

91 मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, ओप्पो ए 53 2020 स्मार्टफोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅम अशा 2 व्हेरिअंटमध्ये विक्री सुरू आहे. या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 990 रुपये इतकी होती. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोन 15 हजार 490 रुपयांत खरेदी केला जात होता. मात्र, आता या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत घट झाली आहे. किंमतीतील कपातीनंतर दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 10 हजार 990 रुपये आणि 12 हजार 900 रुपये झाली आहे. हे देखील वाचा- Moto G40 Fusion स्मार्टफोनसाठी आज फ्लॅश सेल, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

ओप्पो ए 53 2020, अँड्रॉइड 10 वर आधारित कलर ओएस 7.2 वर कार्यरत आहे. यामध्ये 6.5-इंच एचडी+ (1,600×720 पिक्सल) डिस्प्ले (90 Hz रिफ्रेश रेट) आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (16MP + 2MP + 2MP) आहे. याशिवाय सेल्फीसाठी पुढील बाजूला एक 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा होल-पंच अटआउटच्या आतमध्ये सेट करण्यात आला आहे. ओप्पो ए 53 मध्ये 64 जीबी/ 128 जीबी स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.