Moto G40 Fusion स्मार्टफोनसाठी आज फ्लॅश सेल, अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
Moto G40 Fusion (Photo Credits: Motorola India)

मोटोरोला कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G40 Fusion साठी आज दुपारी 1 मे रोजी फ्लॅश सेलसाठी उपलब्ध करुन दिला गेला आहे. या डिवाइसचा सेल ई-कॉमर्स वेबसाइट Flipkar वर दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर आणि डिल सुद्धा मिळणार आहे. प्रमुख स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास Moto G40 Fusion मध्ये क्वॉलकॉमचे प्रोसेसर आणि 6,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.(Instagram वर Clubhouse सारखे फिचर, लाईव्ह दरम्यान व्हिडिओ-ऑडिओ करता येणार बंद)

कंपनीने स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD Plus HDR10 डिस्प्ले दिला गेला आहे. याचा रिफ्रेश्ड रेट 120Hz आहे. हा फोन अॅन्ड्रॉइड11 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. प्रोसेसरसाठी फोनमध्ये क्वॉलकॉम Snapdragon 732G चा सपोर्ट मिळणार आहे. या व्यतिरिक्त 118 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि मॅक्रो लेन्स ही दिली जाणार आहे. त्याचसोबत एक डेप्थ सेंसर ही मिळणार आहे. तर तुम्ही रात्री फोटोग्राफी करणार असल्यास त्यासाठी LED फ्लॅश लाइटचा सपोर्ट दिला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 32MP चा कॅमेरा दिला आहे. पॉवरबॅकअपसाठी फोनमध्ये 6,000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. जी सिंगल चार्जमध्ये दिवसभर आरामात वापरता येते. मेमोरी कार्डच्या मदतीने फोनचा स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येणार आहे. फोनमध्ये Google Assistant बटण दिले गेले आहे.(Flipkart Big Saving Days: येत्या 1 मे पासून स्वतात खरेदी करता येणार 'हे' टॉप स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर्ससह नवी किंमत)

Moto G40 Fusion स्मार्टफोन 4GB रॅम+64GB स्टोरज आणि 6GB+128GB स्टोरेज वेरियंटमध्ये मिळणार आहे. त्यांची किंमत क्रमश: 13,999 रुपये आणि 15,999 रुपये आहे. ऑफर्स बद्दल बोलायचे झाल्यास ICICI बँककडून क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास 1 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. त्याचसोबत Axis बँकेकडून 5 टक्के कॅशबॅक ही मिळणार आहे. या व्यतिरिक्त Moto G40 Fusion फोन 2,334 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI वर खरेदी करता येणार आहे. कंपनी G40 Fusion आणि G60 नंतर Moto G20 उतरवण्याच्या तयारीत आहे. हा फोन फेडरल कम्युनिकेशन्स कमीशन म्हणजेच FCC च्या बेवसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे.