Flipkart Big Saving Days: येत्या 1 मे पासून स्वतात खरेदी करता येणार 'हे' टॉप स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर्ससह नवी किंमत
Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

Flipkart Big Saving Days ची सुरुवात येत्या 2 मे पासून होणार असून तो 5 दिवस सेल 7 मे पर्यंत असणार आहे. मात्र Flipkart Plus मेंबर्सला या सेलचा 1 मे रोजी पासूनच लाभ घेता येणार आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी हा सेल 1 मे रोजी 12AM ला लाईव्ह होणार आहे. या सेलमध्ये स्वतात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ससह स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत स्मार्ट टीव्ही सुद्धा खरेदी करण्यावर 75 टक्क्यांपर्यंत ऑफर दिली जाणार आहे.(Vivo V21 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन)

या सेल दरम्यान Samsung Galaxy F12 स्मार्टफोन 9,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर Galaxy F41 फोन 12,499 रुपये देऊन घरी आणू शकता. या फोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत दिल्याप्रमाणे आहे. तर फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंट असणारा तुम्हाला 14,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. Galaxy F62 च्या बेस वेरियंटला 17,999 रुपयांत खरेदी करता येईल. Apple iPhone 11 हा 44,999 रुपये सुरुवाती किंमत तर Asus ROG Phone 3 स्मार्टफोन 46,999 रुपये देऊन खरेदी करु शकता. iQOO 3 चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंट 24,990 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. तर Xiaomi Mi 10T फोन 27,999 रुपयांत विकत घेऊ शकता.(Netflix ने लॉन्च केले ‘Play Something’ फिचर; युजर्सचा कल पाहून दाखवणार आवडीचे प्रोग्राम)

त्याचसोबत POCO M3 स्मार्टफोन तुम्हाला 12,999 रुपयांऐवजी 9,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. Flipkart Big Saving Days Sale मध्ये लिस्ट  करण्यात आलेले स्मार्टफोन HDFC कार्डच्या मदतीने खरेदी करता येणार आहेत. त्यावर तु्म्हाला 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट सुद्धा दिला जाणार आहे. तसेच नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येणार आहे. स्मार्टवॉचच्या खरेदीवर 60 टक्के सूट ऑफर केली जात आहे. तर टॅबलेटवर 40 टक्के सूट मिळणार आहे.