विवो (Vivo) कंपनीचा नवा स्मार्टफोन Vivo Y20G आज अखेर भारतात लाँच झाला आहे. जबरदस्त बॅटरी लाईफ आणि कॅमेरा फिचर यामुळे हा स्मार्टफोन बाजारातील Redmi, Oppo, Realme सारख्या स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देणार आहे. याआधी बाजारात आलेल्या Vivo Y20 स्मार्टफोनचे हे अॅडव्हान्स मॉडल असेल. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping Site) साइट Amazon, Flipkart सह Paytm, Tatacliq आणि अन्य पार्टनर रिटेल स्टोर्सवरुन खरेदी करता येईल.
या स्मार्टफोनमध्ये 6.51 इंचाची HD+ डिस्प्ले देण्यात आली आहे. फोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसरसह 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. विवोचा हा नवा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 11 वर आधारित FuntouchOS 11 वर काम करतो.
हेदेखील वाचा- Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, झिरो डाउन पेमेंट स्किम आणि 1 हजार रुपयांच्या कॅशबॅकवर घरी घेऊन जाता येणार
याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, Vivo Y20G मध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहे. यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP दोन अन्य कॅमेरे देण्यात आले आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरण्यात आला आहे.
Vivo Y20G मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात कनेक्टीव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi ac, ब्लूटुथ 5.0 GPS/GLONASS/Beidou, मायक्रो-USB पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक फिचर्ससुद्धा देण्यात आला आहे. तसेच यात फिंगरप्रिंट सेंसर आणि जायरोस्कोप सुद्धा देण्यात आला आहे.