स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो (Vivo) ने भारतीय बाजारात एकाहून एक सरस स्मार्टफोन्स आणून स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. बदलत्या काळानुसार स्मार्टफोनमध्येही त्याप्रमाणे बदल केले. त्याच धर्तीवर उद्या म्हणजेच 13 ऑक्टोबरला विवो आपला नवा स्मार्टफोन Vivo V20 भारतात लाँच करणार आहे. ऑनलाईन शपिंग साइट Flipkart वर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा (Camera) असू शकतो असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन (Qualcomm Snapdragon) 720G प्रोसेसर सुद्धा असेल.
या स्मराट्फोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर यात 6.44 इंचाची डिस्प्ले असू शकते. त्याचबरोबर यात छोटा ड्रॉप नॉच असू शकतो. त्याचबरोबर यात AMOLED डिस्प्ले पॅनल दिला जाऊ शकतो. फोनमध्ये HD+ रिजोल्युशन दिले जाऊ शकते. Vivo Y20, Vivo Y20i Launched In India: व्हिवो कंपनीने लॉन्च केले 'हे' 2 धमाकेदार स्मार्टफोन; कमी किंमतीत 4 कॅमेऱ्यांचा समावेश
Wickets are down, but the game has just begun.#1DayToGo for #DelightEveryMoment with #vivoV20. Watch the launch tomorrow at 12PM to win 20 V20s. #vivoV20Series pic.twitter.com/og6ykyDIbH
— Vivo India (@Vivo_India) October 12, 2020
या स्मार्टफोनमध्ये 64MP चा कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तर सेल्फीसाठी 44MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात f//1.89 चे अपर्चर दिले जाऊ शकते. त्याशिवाय यात 8MP चा अल्ट्रा वाइड सेंसर दिला जाऊ शकतो फोनमध्ये 2MP चा मायक्रो सेंसरही दिले जाऊ शकते. यात 8GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज दिले जाऊ शकते.
याच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर , Vivo V20 ची किंमत 30,000 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर यात चार्जिंगसासाठी 4000mAh ची बॅटरी आणि 33W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि USB Type C दिले जाऊ शकते.