Christmas Sale: विवो कंपनीचे व्ही 17, व्ही 17 प्रो, व्ही 15 प्रो यांच्यासह 'या' 5 स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार विशेष सूट
Vivo Z1 Pro (Photo Credits: Vivo India)

नव्या वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपनीकडून आकर्षित अशी सूट देण्यात येत आहे. चीनी कंपनी एमआयएमने त्यांच्या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट दिली होती. मात्र, विवो कंपनीने यावर्षी हा विडा उचलला असून त्यांनी

व्ही 17 (Vivo V17), व्ही 17 प्रो (Vivo V17), विवो व्ही 15 प्रो (Vivo V15), विवो एस 1 (Vivo S), आणि विवो वाय 19 (Vivo V19) या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट दिली आहे. स्मार्टफोन निर्मितीत आघाडीवर असलेल्या विवो कंपनीचा ख्रिसमस सेल सुरू झाला असून, या सेलमध्ये ग्राहकांसाठी विवो स्मार्टफोन खरेदीवर विशेष सूट देण्यात येत आहे.

विवो कंपनीचा हा धमाकेदार सेल उद्यापासून (20 डिसेंबर) सुरु होणार आहे. वरीलपैंकी काही स्मार्टफोनवर 1 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे नो-कॉस्ट ईएमआय, बँक ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर्सही ग्राहकांना दिल्या जात आहेत. तसेच एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. वरील स्मार्टफोनवरच कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Realme X2: जबरदस्त स्टोरेज फिचर्स आणि आकर्षक डिझाईन असलेला रियलमी एक्स2 आज भारतात होणार लाँच; येथे पाहा Live Streaming

Vivo V17, Vivo V17 Pro, Vivo V15 Pro, Vivo S1 आणि Vivo Y19 केवळ याच स्मार्टफोन्सवर कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. तसेच Vivo Z1 Pro, Vivo Z1x आणि Vivo U20 या स्मार्टफोन्सच्या खरेदीवर कंपनीकडून सेल्फी स्टिक दिली जाणार आहे. हे सर्व स्मार्टफोन कंपनीच्या 'ई-स्टोर'वरून ग्राहक खरेदी करू शकतात. जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.