एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली आहे. ट्विटरचे मालक मस्क यांनी ट्विट करून माहिती दिली की, लिंडा याकारिनो (Linda Yacarino) या कंपनीच्या नव्या सीइओ असतील. त्यांनी लिहिले की, 'मी ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनोचे स्वागत करण्यास उत्सुक आहे. लिंडा प्रामुख्याने व्यवसाय ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करतील, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेन. अॅप 'X' मध्ये प्लॅटफॉर्मचे पूर्णतः रूपांतर करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक आहे.' लिंडा याकारिनोचा जन्म 1962 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये बॉब याकारिनो आणि इसाबेला याकारिनो यांच्या पोटी झाला. त्यांची वांशिकता इटालियन आहे, परंतु त्या अमेरिकेत जन्मल्या आणि वाढल्या.
लिंडा यांनी त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले त्यानंतर त्या पेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या. तिथे त्यांनी दूरसंचार आणि लिबरल आर्ट्समध्ये पदवी मिळविली. लिंडा या 2011 मध्ये NBCUniversal मध्ये रुजू झाल्या आणि सध्या त्या तिथे एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. (हेही वाचा: Elon Musk On Twitter New Features: लवकरच ट्विटरवर येणार व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटची सुविधा)
I am excited to welcome Linda Yaccarino as the new CEO of Twitter!@LindaYacc will focus primarily on business operations, while I focus on product design & new technology.
Looking forward to working with Linda to transform this platform into X, the everything app. https://t.co/TiSJtTWuky
— Elon Musk (@elonmusk) May 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)